स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व. सशस्त्र क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान ठरले. देशाच्या राजकारणात मार्गदर्शक ठरले. पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, अस्पृश्यता यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. आधुनिकीकरण, वैज्ञानिक दृष्टीकोन, सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. आजही पचवायला कठीण वाटणाऱ्या विचारांचं संचित त्यांनी आपल्याला दिलं. समाज प्रबोधनासाठी नाटकं लिहिली, लावण्या लिहिल्या, पोवाडे-फटके लिहिले. या साऱ्याची सुरुवात झाली ती अगदी लहानपणीच.

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ ला नाशिक जवळच्या भगूर येथे झाला. वडील दामोदरपंत आणि आई राधाबाई. वीर विनायकाचे जेष्ठ बंधू गणेश दामोदर अर्थात बाबाराव सावरकर, बहीण मैनाबाई, धाकटे बंधू नारायण दामोदर अर्थात बाळ सावरकर. आई राधाबाई लवकर वारल्यामुळे दामोदरपंतांनीच आपल्या मुलांचा सांभाळ केला.

 

दामोदरपंतांचा वाचनाचा दांडगा व्यासंग होता, घरी पुस्तकांचा मोठा संग्रह होता. त्यांना कविता करण्याचाही छंद होता. याचंच बाळकडू वीर विनायकाला मिळालं.

 

अनेक विषयांच्या संस्कृत, मराठी, इंग्रजी ग्रंथांचं, केसरी, काळ, पुणे वैभव अशा वृत्तपत्रांचं त्यांचं नियमित वाचन असे. त्यातून देशप्रेम, कसा, कुठे छापला गेला, त्याच्या अनेक आवृत्या कशा निघाल्या, कुठल्या परिस्थितीत बोस, भगतसिंग यांनी त्या काढल्या, हा ग्रंथ जवळ बाळगणं हाही गुन्हा होता त्या काळात तो ३०० रुपयांना कसा विकला जात होता. या साऱ्या 'इतिहासाची गोष्ट' वाचण्यासारखी आहे.

 

मूळ मराठी ग्रंथाचं हस्तलिखित सावरकरांच्या अटकेनंतर मादाम कामांनी फ्रेंच बँकेत ठेवलं होतं ते त्यांच्या निधनानंतर बराच प्रवास करत करत गोव्याचे श्री. कुटिन्हो, डॉ. मुंजे असे हात बदलत प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे पोहोचलं. आता मात्र ती अमूल्य प्रत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आहे.

ब्रिटिशांचं साम्राज्य असल्यामुळे हिंदुस्थानात मात्र १८५७ चा सुवर्ण महोत्सव उघडपणे साजरा करणं शक्य नव्हतं तरी तो गुप्तपणे साजरा झालाच, त्यागाच्या, बलिदानाच्या शपथा घेतल्या गेल्याच, पण त्यामुळे चिडलेल्या लॉर्ड मिंटोंनी दडपशाही सुरु केली. लाला लजपतराय, सरदार अजितसिंह यांना मंडालेला डांबण्यात आलं. त्याविरोधात सावरकरांनी लेखणी उचलली. न्युयॉर्कहून निघणाऱ्या 'गॅलिक अमेरिकन' मध्ये त्यांचे लेख छापून येऊ लागले. याच लेखांचे जर्मन, फ्रेंच, इटालियन, रशियन, पोर्तुगीज भाषेतले अनुवाद त्या त्या देशात प्रसिद्ध होऊ लागले. आणि सावरकरांच्या विचाराप्रमाणे घडू लागलं. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगभर चर्चिला जाऊ लागला.

 

जर्मनीत स्टूटगार्ट इथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत, २२ ऑगस्ट १९०७ या दिवशी सावरकरांच्या कल्पनेतून साकारलेला भारताचा तिरंगा, मादाम कामा यांनी तिथे झळकवला. काही तांत्रिक अडचणींमुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा ठराव त्या तिथे मांडू शकल्या नाहीत पण त्यांच्या भाषणानं प्रभावित झालेल्या जागतिक सभेनं उभं राहून, टाळ्यांच्या कडकडाटात हिंदुस्थानच्या ध्वजाला मानवंदना दिली.

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने राष्ट्रीय कविता लिहून स्वातंत्र्यकवी गोविंद म्हणून ख्याती पावलेल्या आबा दरेकरांच्या कविता छापल्याबद्दल आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडाची चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली 'काळ' या वृत्तपत्रांसाठी त्यांनी १९०९ पर्यंत त्रेचाळीस 'लंडनची बातमीपत्र' लिहिली, जी देशभर अनेक वृत्तपत्रांनी भाषांतर करून छापली.

 

सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राच्या निवडक भागाचं मराठी भाषांतर केलं. ह्या पुस्तकाची प्रस्तावनाच क्रांतिकारकांची गीता ठरली. सावरकर लंडनला पोहोचण्यापूर्वीच, 'या पेटत्या निखाऱ्यावर' लक्ष ठेवण्याची सूचना स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांना मिळालेली होती. तरीसुद्धा या ग्रंथाची प्रत हिंदुस्थानात पोहोचली. सावरकरांचे जेष्ठ बंधू बाबाराव सावरकरांनी खूप धडपड करून तो ग्रंथ प्रकाशित केला. तो ग्रंथही ब्रिटिशांनी जप्त केला. पण त्याआधीच ती प्रस्तावना सर्वामुखी झाली होती. पुस्तकापेक्षाही, पुस्तकाच्या प्रस्तावनेला इतकं महत्व प्राप्त झालेलं हे एकमेव उदाहरण.

 

१८५७ चा उठाव मोडून काढल्यानंतरच ब्रिटिश हिंदुस्थानात पक्के स्थिरावले. त्यामुळे १९०७ हे वर्ष, त्या विजयाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून ब्रिटिश साजरं करत होते. पण सावरकर स्वस्थ बसले नाहीत त्यांनी भारतभवनातच दणक्यात साजरा केला १८५७ च्या 'हौतात्म्याचा' सुवर्ण महोत्सव.

 

१८५७ ला सुरु झालेले हे युद्ध अजून संपलेले नसून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुरूच राहील, तसंच १८५७ च्या हुतात्म्यांचा सूड घेतला जाईल, असा इशारा देणारी पत्रकं वाटली गेली, १८५७ ची स्मृतिचिन्ह विद्यार्थ्यांनी छातीवर मिरविली तीही लंडनमध्ये. साहजिकच ब्रिटिश आणि भारतीय विद्यार्थ्यांमध्ये रस्तोरस्ती चकमकी झडल्या.

 

मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, राणाकुंवर सिंह, अझीमुल्ला खान, बहादुरशहा जफर अशा अनेकांनी १८५७ मध्ये जो लढा दिला ते 'शिपायांचं बंड' नव्हतं तर ते 'स्वातंत्र्यसमर' होत हे सावरकर नुसते आपल्या भाषणातून सांगत राहिले नाहीत तर त्यांनी वयाच्या केवळ पंचविसाव्या वर्षी त्या उठावाचा साद्यंत इतिहास लिहिला. १८५७ चे स्वातंत्र्यसमर' हाच ऐतिहासिक ग्रंथ, भारतीय क्रांतिकारकांची गीता ठरला. प्रकाशना पूर्वीच जप्त झालेल्या या ग्रंथानं इतिहास निर्माण केला. हा ग्रंथ त्यांना प्रेरणा देणाऱ्या या 'देवा'ची, शिवाजी महाराजांची आरती लिहिली, जी दर शुक्रवारी कॉलेजच्या वसतिगृहात म्हटली जात असे.

 

ऐकणाऱ्याचं रक्त सळसळून उठेल असे तानाजीच्या आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमावरचे पोवाडे, प्रथम पारितोषिक प्राप्त विधवांच्या दुःखावर लिहिलेली कविता आणि 'ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का करावेत' हा निबंध याच काळातले. जयोस्तुते हे अजरामर स्वतंत्रतेचं स्तोत्र त्यांनी लिहिलं तेही याच काळात. त्यावेळी त्यांचं वय होतं केवळ वीस.

 

स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी १९०५ मध्ये परदेशी कापडांची होळी केली. ही देशातली पहिली होळी. या होळीसाठी त्यांना प्रोत्साहन मिळालं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं. या होळीनं ब्रिटिशांना चांगलेच चटके बसले. वीर विनायकालाही शिक्षा झाली. वसतीगृह सोडावं लागलं, दंड भरावा लागला.

 

१९०६ मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले. पण खरा हेतू होता तो शत्रूच्याच गोटात शिरून त्यांचा कारभार पहाणं, तिथे शिकायला येणाऱ्या वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांमार्फत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगासमोर मांडणं, तिथल्या भारतीयांना क्रांतिकार्यासाठी प्रवृत्त करणं. रशियन, आयरिश, इजिप्शियन, चिनी क्रांतिकारकांशी संपर्क बनवण्याची कृती, पिस्तुलं मिळवलं. साधून बाँब मग श्यामजींच्या 'इंडिया हाउस'चं नामकरण झालं 'भारत भवन'. लंडनमध्ये अभिनव भारत'चं कार्य सुरु झालं ते 'फ्री इंडिया सोसायटी' या नावानं. रविवारी फ्री इंडियाच्या गुप्त सभा सुरु झाल्या आणि हरनाम सिंग, मदनलाल धिंग्रा, सेनापती बापट, व्ही. व्ही. एस. अय्यर, लाला हरदयाळ, सरदारसिंग राणा असे भारतातून तिथे आलेले अनेकजण, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याच्या, वेळप्रसंगी प्राणत्याग करण्याच्या तयारीनिशी सावरकरांच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले.

 

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सावरकरांनी लॉर्ड मोर्ले यांचं हिंदुस्थानच्या अर्थसंकल्पावरचं भाषण ऐकलं आणि मुंबईचा 'विहारी' आणि पुण्याच्या गुलामगिरीबद्दलची चीड जागृत झाली. सभोवतालच्या परिस्थितीचं भान आलं. लेखणीला तेज, स्फूर्ती मिळाली.

 

वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी जसा स्वदेशीचा फटका लिहिला, तसाच सवाई माधवरावांचा रंगांची उधळण करणारा फटकाही लिहिला.

 

प्लेगच्या साथीनं हैराण झालेल्या देशबांधवांना छळणाऱ्या, त्यांच्यावर जुलूम अत्याचार करणाऱ्या रँडचा खून करणाऱ्या चाफेकर बंधू, रानडे यांना झाली आणि सावरकरांचं तरुण रक्त सळसळून उठलं. त्यांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी, देशाचं स्वातंत्य परत मिळविण्याची शपथ घेतली. चाफेकरांच्या बलिदानावर फटकाही लिहिला.

 

प्लेगच्या साथीत वडील दामोदरपंत आणि काकांचा अंत झाल्यावर भगूर सोडून सारं कुटुंब नाशिकमध्येच स्थिरावलं. त्यांच्या पश्चात बाबाराव सावरकर आणि त्यांच्या पत्नी यशोदा अर्थात येसूवहिनींनी आपल्या भावंडांना सांभाळलं. स्वतः हालअपेष्टा सोसून त्यांना शिकवलं.

 

वीर विनायकाचं माध्यमिक शिक्षण नाशिकमध्येच झालं. तिथे त्यांनी त्या लहान वयातच 'राष्ट्रभक्त समूह' ही गुप्त संघटना स्थापन केली, जी जगभरात पसरली ती अभिनव भारत' या नावानं. गुप्त संघटनेचं प्रकट रूप म्हणून त्यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली. मित्रमेळ्याच्या वतीनं शिवाजी उत्सव, गणेश उत्सव साजरे केले जाऊ लागले. उघडपणे सामाजिक कार्य तर गुप्तपणे क्रांतीच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. वीर विनायकाच्या भाषणांनी, त्याच्या आणि स्वातंत्र्यकवी गोविंद यांच्या पोवाडयांनी नाशिक निनादू लागलं आणि अनेक तरुण क्रांतीकार्यासाठी प्रेरित झाले. मरगळलेल्या मनांना आणि हातांना चेतना मिळाली. अध्यात्माची ओढ असणारे बाबाराव सावरकरही क्रांतिकार्यात ओढले गेले आणि आपल्या कर्तृत्ववान भावाच्या बरोबरीने उभे ठाकले.

 

१९०२ मध्ये सावरकर पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथेही त्यांनी मुलांना देशासाठी लढण्यास, अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यास प्रवृत्त केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं दैवत, म्हणून बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनानं जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडलं. ह्या घटनेचा सूड म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या. त्याबद्दल धिंग्रांना फाशी देण्यात आलं. धिंग्रांचं लेखी निवेदन पोलिसांनी दाबून टाकल्यामुळे फाशीच्या आदल्या दिवशी सावरकरांनी ते निवेदन इंग्लंड, अमेरिकेत छापून आणलं. त्या निवेदनानं लंडनमध्ये जणू बॉम्बच पडला. धिंग्रांचं धाडस वाखाणण्यासारखं होतं. विन्स्टन चर्चिलसह अनेकांनी, अनेक वृत्तपत्रांनी त्या निवेदनाची, त्या कृतीची दखल घेतली. खरंतर त्या निवेदनाचे कर्ते होते स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर.

 

इकडे भारतात कर्णावती इथं लॉर्ड मिंटोवर बॉब टाकण्याचा प्रयत्न झाला आणि सावरकरांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकरांना पकडण्यात आलं. पुढे त्यांना सोडलं पण ही बातमी येसूवहिनींकडून कळल्यावर सावरकरांनी त्यांना 'सांत्वन' पर कविता पाठवली.

 

या साऱ्या घडामोडीनंतर सावरकर पकडले जाणार हे निश्चित होतं. मग ते भारतभवन सोडून घरं बदलत शेवटी ब्रायटनला पोहोचले. एका संध्याकाळी किनाऱ्यावर फेरफटका मारत असताना त्या अथांग सागराला पाहून, मातृभूमीच्या वियोगानं अस्वस्थ झालेल्या सावरकरांनी त्या सागरालाच साद घातली ...आणि जन्मली एक अजरामर कविता... ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला....

 

इंग्रजांशी दोन हात करायचे तर विचार आणि कृतीला शस्त्रांची जोड हवी हे जाणून सावरकरांनी इतर देशांमधून बॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं होतं. ते तंत्रज्ञान आणि पुस्तकांत लपवून २२ ब्राऊनिंग पिस्तुलं त्यांनी चतुर्भुज अमीन याच्याकरवी भारतात पाठवली. त्यातल्याच एका पिस्तुलाचा वापर करून अनंत कान्हेरे या युवकानं, नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या तिघांना फाशी आणि वामन जोशी यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, भारतात आलेली पिस्तुलं सावरकरांनी पाठवली हे कळल्यावर, सावरकरांना लंडनमध्ये अटक झाली....

 

ब्रिक्स्टनच्या कारागृहात असताना त्यांचे तिथले सहकारी त्यांना येऊन भेटत होते (याच कारागृहातून सावरकरांनी लिहिली हृदयस्पर्शी पत्रं, 'माझे मृत्युपत्र' अशा कविता). लंडनमध्येच अभियोग चालावा याच्या तसंच सावरकरांना कारागृहातून पळवून नेण्याच्या योजना आखल्या गेल्या पण यश मिळालं नाही. सावरकरांच्या मनातली योजना मात्र पक्की होती. त्यांनी व्ही. व्ही. एस. अय्यरना फक्त सुचवलं. हिंदुस्थानच्या वाटेवर मार्से बंदरांवर बोट थांबेल'.

 

.... आणि त्यानुसार, कडक पहारा चुकवून ८ जुलै १९१० ला सावरकरांनी मार्से किनाऱ्याजवळ भर समुद्रात उडी घेतली. पोहत फ्रान्सचा किनारा गाठला. मादाम कामा, व्ही. व्ही. एस. अय्यर आणि सावरकरांची थोडक्यात चुकामूक झाली. फ्रान्सच्या भूमीवर, आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार ब्रिटिश काही करू शकणार नाहीत या सावरकरांच्या विचारांना तडा गेला. त्यांना पुन्हा पकडण्यात आलं.

 

ब्रिटिशांनी ही बातमी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण सावरकरांचे सहकारी कार्यरत होतेच. ही बातमी जगभर पसरली. जगभरातल्या वर्तमानपत्रांनी मान्यवरांनी या घटनेचा, फ्रांस आणि ब्रिटनचाही निषेध केला. त्यामुळे 'सावरकरांना आमच्या ताब्यात द्या' अशी तोंडदेखली मागणी फ्रेंच सरकारनं ब्रिटिशांकडे केली आणि दोन्ही देशांनी मिळून नावापुरताच, हा खटला हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवण्यात येईल असं पत्रकही काढलं.

 

पण प्रत्यक्षात ब्रिटिशांना कुठल्याही परिस्थितीत सावरकरांना सोडायचं नव्हतं. त्यामुळे त्यांना दोन जन्मठेपेची, पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

 

सावरकर कुटुंबाचं सारं काही जप्त झालं, घरातले तिघेही पुरुष त्यावेळी तुरुंगात आणि स्त्रिया रस्त्यावर. पण त्या कुटुंबाला त्याची तमा नव्हती. सावरकर घराण्यानं ते व्रत जाणुनबुजूनच घेतलं होतं... 'की घेतलें व्रत न हैं अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्गमानें, जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिलें करि हे सतीचे'.

 

ब्रिटिश सरकारनं अंदमानात सावरकरांना आणि बाबारावांना बैलाप्रमाणे कोलूला जुंपलं, त्यांचा अनन्वित छळ केला. पण त्यालाही पुरून उरत सावरकरांचं कार्य सुरूच राहिलं. त्यांनी सहबंद्यांना धीर दिला, त्यांना एकत्र आणलं, लिहायला-वाचायला शिकवलं. त्यांच्यासाठी ग्रंथालय निर्माण केलं. त्यांची शुद्धी केली. पूर्वीच्या त्या भयंकर वातावरणात, भीषण अंधारात, त्रासदायक प्राण्यांच्या संगतीत, फाशीचे कैदी विव्हळत आहेत, मारहाण झालेले रडत आहेत, कोणी जीव दिला आहे, कोणी जीव द्यायच्या विचारात आहे, खायलाप्यायला घड नाही, आवश्यक सोयी नाहीत अशा वातावरणात त्यांनी हजारो ओळींचं काव्य लिहिलं आणि तेही भिंतीवर. सारंच अलौकिक.

 

सावरकर बंधू अंदमानमधून सुटावेत म्हणून प्रयत्न सुरु होते, ब्रिटिश त्यांना सोडण्याचा धोका पत्करायला तयार नव्हते. पण जनमताच्या वाढत्या दबावामुळे अखेर १९ वर्षांनी, १९२१ मध्ये सावरकरांना अंदमानातून भारतातील तुरुंगात आणलं गेलं.

 

त्या काळात येरवडा तुरुंगात देखील सावरकरांनी अस्पृशता निवारण, शुद्धीकार्य आणि अन्यायाचा प्रतिकार केला.

 

८ जानेवारी १९२४ या दिवशी सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आलं. उघडपणे समाजकारण आणि त्याआडून राजकारण तरी करता येईल या मुत्सद्दी विचारानं त्यांनी स्थानबद्धतेची अट स्वीकारली. १९२४ ते १९३७ अशा रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या १३ वर्षात

 

त्यांनी समाजोद्धाराचं जे कार्य केलं त्याला तोड नाही. स्वतःच्या पायात स्थानबद्धतेची बेडी अडकवून सावरकरांनी हिंदू समाजाला वेढून बसलेल्या रोटीबंदी, बेटीबंदी, वेदोक्तबंदी, सिंधुबंदी, स्पर्शबंदी, शुद्धीबंदी, व्यवसाय बंदी अशा सप्तशृंखला तोडण्याचा प्रयत्न केला.

 

अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजन, सहपूजन, हळदीकुंकू समारंभ साजरे केले. अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला, त्यांना इतर मुलांच्या बरोबरीनं बसता येऊ लागलं. अस्पृश्यांसाठी त्यांनी गादीचे कारखाने, वाजंत्री (बैंड) पथकं, उपाहारगृह सुरु केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. सावरकरभक्त भागोजी कीर यांनी बांधलेल्या पतितपावन मंदीरात अस्पृश्यांना नुसता मंदीर प्रवेशच नाही तर गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान मिळाला.

 

हिंदुंना संघटीत करण्याचं एवढं मोठं कार्य मुंबई, पुण्यासारख्या प्रगत शहरातही घडलं नव्हतं ते रत्नागिरीत घडलं. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी तर रत्नागिरीतलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काम पाहून, आपलं उरलेलं आयुष्य त्यांनाच मिळावं अशी प्रार्थना केली होती.

 

या काळात त्यांनी माझी जन्मठेप, हिंदुत्व, हिंदुपदपादशाही, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा ही पुस्तकं, मला काय त्याचे, काळेपाणी या कादंबऱ्या, उ:शाप, संन्यस्त खड्डा, उत्तरक्रिया ही नाटकं लिहिली.

 

आपल्या समृद्ध मराठी भाषेवरचं परकीय आक्रमण रोखण्यासाठी त्यांनी भाषाशुद्धी आंदोलन उभारलं. कलागृह, चित्रपट, दिग्दर्शक, छायाचित्रण, महापौर, हुतात्मा, निर्माता, दिग्दर्शक, शस्त्रसंधी, दूरध्वनी, नभोवाणी, असे अनेक प्रतिशब्द आपल्याला दिले. टंकलेखन सुलभ व्हावं यासाठी त्यांनी लिपीशुद्धी सुचवली ज्यायोगे देवनागरीतल्या टंकांची संख्या खूप कमी झाली. अनेक विषयांवर त्यांनी देशवासीयांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी शेकडो व्याख्यानं दिली, पत्रकं काढली, लेख लिहिले.

 

देशभरातल्या बाटवलेल्या हिंदूचं शुद्धीकरण, हिंदुसाठी अनाथालयं, स्वयंसेवक संघटना बांधणं, स्वदेशीचा प्रचार, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक मुद्द्यांचा ते प्रचार करीत राहिले. त्यातूनच प्रेरणा घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण झाला, अनेक ठिकाणी शुद्धीकार्य घडलं.

 

२३ डिसेंबर १९२६ या दिवशी बाटवलेल्या सहस्रावधी हिंदुंची शुद्धी करणाऱ्या स्वामी श्रद्धानंदांचा अब्दुल रशीदनं खून केला. त्यानंतर १० जानेवारी १९२७ पासून सावरकर बंधूंनी श्रद्धानंद साप्ताहिक काढण्यास १९४१ मध्येच आसामात मुस्लीम घुसखोरी सुरु झाली होती त्याबाबत सावरकरांनी सावध केलं होतं. 'निसर्गाला पोकळी सहन होत नाही' असं म्हणत नेहरूंनी तिकडे दुर्लक्ष केलं तिबेट हे बफर स्टेट आहे ते हातचं घालवू नका, नागांची बंडखोरी लगेच मोडून काढा, पाकिस्तान जशी आक्रमक पावलं टाकेल त्याला तसंच उत्तर द्या, असं सावरकर सांगत होते. पण तिकडेही दुर्लक्ष केलं गेलं. आज या सगळ्याच प्रश्नांनी उग्र रूप धारण केलं आहे.

 

देशाचं विभाजन करणारी क्रिप्स योजना सावरकरांनी धुडकावून दिली होती. पण काँग्रेसनं तिकडे लक्ष दिलं नाही. उलट २ मे १९४२ ला काँग्रेस समितीच्या बैठकीत, एखाद्या राज्याला भारतातून फुटून निघायचं असेल तर त्याला भारतात रहाण्याची सक्ती केली जाणार नाही हे मान्य केलं गेलं. गांधीजींनी 'भारत छोडो' चळवळ सुरु केली. पण तिचं रुपांतर शेवटी भारत तोडो' मध्ये होणार हे सावरकरांचं भाकीत खरं ठरलं.

 

पाकिस्तानच्या मागणीला काँग्रेस आणि गांधींचाही पाठींबा होता. सावरकर मात्र तळमळून फाळणीला विरोध करत राहिले.

 

आयुष्याची ८३ वर्ष, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी फक्त देशाचाच विचार केला. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी पासून त्यांनी अन्न, पाणी, औषध वर्ज्य केलं. भारतीयांसाठी खूप मोठं विचारांचं संचित मागे ठेऊन २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नावाचा धगधगता अंगार शांत झाला.