या केंद्राचे उद्घाटन श्री रणजित सावरकर यांनी दि. १९ डिसेंबर २००९ रोजी केले. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याची स्मारकाची योजना आहे. केवळ एका वर्षातच प्रशिक्षक श्री स्वप्नील परब यांच्या मार्गदर्शना खाली आपले ७ खेळाडू मुंबई विश्वविद्यालय स्पर्धेत अजिंक्य ठरले आहेत. पुढील वर्षात राष्ट्रीय पटली गाठण्याचे आमचे ध्येय आहे. धनुर्विद्धद्येमुळे विद्यार्थ्याची एकाग्रता, कौशल्य आणि संवेदनशीलता वाढून व्यक्तीमत्वचा विकास होतो.
हे केंद्र दर शनिवारी ४ ते ६ व रविवारी ९ ते ११ या वेळेत उघडे असते. अधिक माहितीसाठी श्री. स्वप्नील परब भ्रमण ध्वनी क्र. ९७७३४९७०३९