सावरकर कराटे प्रशिक्षण केंद्र : हे केंद्र शातोकन कराटे अकॅडेमी ऑफ इंडिया यांच्याशी संलग्न आहे. ही अकॅडेमी जपान कराटे शातोकन रेनेमाई, इंटरनैशनल जपान कराटे असोसिएशन, महाराष्ट्र कराटे असोसिएशन, ओल इंडिया कराटे फेडरेशन, इंडियन ओलीम्पिक वर्ल्ड असोसिएशन, वर्ल्ड कराटे फेडरेशन यांच्याशी संलग्न आहे. या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख श्री. अनिल पाटील आहेत. ते स्वत: शातोकन अकॅडेमी ऑफ इंडिया चे प्रमुख आहेत. ते स्वत: ५ वे दान ब्लेक बेल्ट धारी आहेत. कराटे क्षेत्रात ते २९ वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या समवेत श्री. सतीश साठे असतात.
हे वर्ग दर सोमवारी आणि गुरुवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत होतात. अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. सतीश साठे ९८६९०२०४४०