या केंद्राची स्थापना युवा वर्गातील साहस क्षमता वाढीस लागावी यासाठी करण्यात आली आहे. गिर्यारोहण, ट्रेकिंग अशा विविध स्वरूपाच्या प्रकारांमधून युवा पिढी घडवली जाते. रोक क्लीम्बिंग, राफ्टिंग व तत्सम प्रकारांचे प्रशिक्षण तज्ञ मान्यवरांकडून दिले जाते. त्याशिवाय निसर्गाशी संबंधी अभ्यास देखील घेतला जातो. यात वन्य प्राणीजीवन, पक्षी निरीक्षण यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकात श्री. राजेंद्र वराडकर यांच्याशी ९८६९२६२५८९ वर संध्याकाळी ५.३० ते ८ या वेळेत संपर्क साधावा.