स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन आणि साहित्य यावर आधारित शतजन्म शोधीताना हा कार्यक्रम निवेदनाद्वारे सावरकर विचारसरणीवर प्रकाश टाकतो. ६० हून अधिक कलावंत असलेला हा भव्यदिव्य कार्यक्रम सावरकरांच्या साहित्यातील विभिन्न अंगांचे (लावणी, पोवाडा, फटका, नाट्यगीत, भावगीत, नाटक इत्यादी) सुरम्य दर्शन घडवतो. संगीत दिग्दर्शक - वर्षा भावे, संगीत संयोजक - कमलेश भडकमकर, नृत्य दिग्दर्शक - रुपाली देसाई, संकल्पना, संहिता आणि लेखन मंजिरी मराठे, निर्मिती प्रमुख - रणजित सावरकर. संपर्क : मंजिरी मराठे ९८२०९०८७२१