स्मारकाकडे अद्यावत वाचनालय आणि संदर्भालय आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण साहित्य तसेच त्यांच्यावर लिहलेले साहित्य उपलब्ध आहे. त्याशिवाय अन्य उपयुक्त साहित्य देखील उपलब्ध आहे. वाचनालयाच्या प्रमुख सौ. शीला रानडे असून त्यांचे वाचकांना उत्तम सहकार्य प्राप्त होते. वाचनालय रविवार वगळता दररोज दुपारी १२ ते संध्याकाळी ७ या वेळेत उधडे असते.