Must Read - The Gandhian Confusion - Translation of गांधी गोंधळ . Now download without registration. Free PDF Download of Now 68 Books by Veer Savarkar.  
  शत्रूच्या शिबिरात, क्ष किरणे, Now download without registration.  
  Shatajanma Shodhitana   शतजन्म शोधिताना
  Dance,Drama, Musical and Audiovisual Program based on literature of Veer Savarkar स्वा. सावरकरांच्या साहित्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम
   
मराठीत वाचा read
  Air Rifle Shooting-   नेमबाजी आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल
  International standard Air Rifle shooting range. आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर रायफल रेंज.
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Yoga   योग
  Yoga ; Natural way to healthy Life योग : निरोगी जीवनाची नैसर्गिक गुरुकिल्ली.
   
मराठीत वाचा read
  Boxing   बॉक्सिंग
  Gentleman's sport सभ्य गृहस्थांचा खेळ
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Karate   कराटे
  Unarmed combat Techniques. निशस्त्र युद्धकला
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Gymnasium   व्यायामशाळा
  A Well equipped Gym.. सुसज्ज बलोपासना केंद्र
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Archery    धनुर्विद्या
  Rapidly emerging as one of the best center in Mumbai. मुंबईतले झपाट्याने पुढे येणारे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र.
   
मराठीत वाचा read
  UPSC, MPSC, CDS, IIT-JEE, NDA training   स्पर्धा परीक्षा वर्ग
  मार्गदर्शन केंद् : UPSC, MPSC, CDS, IIT-JEE, NDA
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Library   ग्रंथालय
  Best reference library on the Armed Freedom Struggle. सशस्त्र क्रांति या विषयावरील उत्तम संदर्भ ग्रंथालय
   
मराठीत वाचा read
  Mountaineering   गिर्यारोहण
  Spirit of Adventure ; love for Nature निसर्ग प्रेमींसाठी साहसी उपक्रम
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Rashtriya Geet Manch   राष्ट्रीय गीत मंच
  Learn Patriotic Songs देशभक्तीपर गीते शिका
   
मराठीत वाचा read
  savarkar,veer savarkar, savarkar smarak, savarkarsmarak, activity, savarkar smarak activities, rifle shooting, boxing, gymnasium, yoga,savarkar literature, download savarkar book, books of savarkar, savarkar smarak activities Savarkar Literature   सावरकर साहित्य मंच
  Collective reading of Savarkar Literature सावरकर साहित्याचे सामुहिक वाचन आणि चर्चा
   
मराठीत वाचा read
1
News :बाबाराव सावरकर

बाबाराव सावरकर

हिंदूंना त्यांच्या अस्तित्वासाठी करावी लागणारी लढाई ही काही अर्वाचीन काळातील नाही तर पुराणकाळापासूनची आहे. रामायण, महाभारत यांच्यापासूनची आहे. अर्वाचीन काळात क्रांतिकारकांनीही सशस्र लढाई केली ती हिंदू राष्ट्रासाठीच. त्यात वासुदेव बळवंत फडकेंपासून चाफेकर बंधू ते अनेकांचा समावेश आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत अजीवन लढत राहिलेले सावरकर बंधूदेखील भावी पिढ्यांसाठी पुढच्या काळासाठी अन् हिंदूंसाठी प्रेरणास्त्रोत व स्फूर्तीस्थान ठरलेले आहेत.

तात्याराव (विनायकराव) 1906 मध्ये लंडनला गेल्यानंतर अभिनव भारत या संघटनेची यशस्वी धुरा सांभाळली ती बाबारावांनी. त्यांनी तरूणांची संघटना उभारली. त्यांना बौद्धिक व शारिरीकदृष्ट्या परिपूर्ण केले. इंग्रजांविरुद्ध वातावरणनिर्मिती केली. वंदे मातरम् व स्वातंत्र्यदेवीच्या घोषणा देत मिरवणूका काढल्यामुळे त्यांच्यावर खटले दाखल झाले. शिक्षा सुनावण्यात आली. तरी त्यांनी आपले कार्य सोडले नाही. विनायकरावांनी लंडन येथून पाठवलेले मॅझिनीचे चरित्र पैसे जमवून धोका पत्करून प्रसिद्ध केले. देशभक्तीपर गीते लिहली. रणवीन स्वातंत्र्य मिळेना, हा सिद्धांत सांगणारे कवी गोविंद यांचे गीत त्यांनी प्रसिद्ध केले. तात्यारावांनी लंडनहून पाठवलेली शस्रास्रे तरूणांना दिली. लोकमान्य टिळक व काळकर्ते परांजपे यांच्या शिक्षेच्या निषेधार्थ बाबा उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या देशभक्तीचा व स्वातंत्र्य चळवळीचा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्यावर खटला भरला. 1908 मध्ये टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली तर 1909 मध्ये बाबांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व त्यांची रवानगी अंदमानला झाली.

तिघे बंधू बाबा (गणेश), तात्या (विनायक) आणि बाळ (नारायण) यांना एकाच वेळी बंदीवास भोगावा लागला. त्यांचे घरदार, शेतीवाडी सर्व राजहृत (जप्त) करण्यात आले. तरीही हे सावरकर कुटुंब मंत्र जपत होते, अगर होय ती वंशकला, निर्वंश जिचा देशाकरिता. त्यांचा निर्धारही होता की, न घेतले व्रत हे अम्हि अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक  म्हणोनि असावयाचे, बुद्धायच वाण धरिले करी ते सतिचे.

बाबांची 1922 साली सुटका झाल्यानंतर त्यांनी तरूण हिंदुसभा स्थापन केली. भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, वा. बं. गोगटे आदी क्रांतिकारक सुरूवातीला बाबांना भेटले नंतर तात्यारावांना. बाबांनी भगतसिंग प्रभुतींची फाशी रद्द व्हावी, यासाठी काँग्रेस नेत्यांपासून अनेकांच्या भेटी घेतल्या. पण एम्पायर सिनेमागृहाजवळील ध्वमस्फोटात सापडलेल्या संशयितांजवळ बाबांची पत्रे सापडल्यामुळे पुन्हा त्यांना तीन-चार वर्षे स्थानबद्ध करण्यात आले. याच काळात बाबांनी राष्ट्रमीमांसा हे पुस्तक लिहले. या पुस्तकात त्यांनी हे हिंदू राष्ट्र आहे, हा विचार साधार मांडला आहे.

तात्याराव रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी चालू केलेली प्रत्येक चळवळ बाबांनी उचलून धरली. त्यांच्या लेखांचा, भाषणांचा देशभर विविध भाषांमधून प्रचार केला. जन्मजात जातीभेद मोडा, सात स्वदेशी शृंखला तोडून टाका, आपल्या भाषेत घुसलेले अनावश्यक परकीय शब्द बहिष्कारा, लिपीत सुधारणा करा आदींचा त्यांनी प्रचार केला. त्यांच्या लिहण्यात व बोलण्यात परकीय शब्द नसे, एवढेच नव्हे तर त्यांना भेटायला आलेल्यांनाही ते स्वकीय शब्द वापरण्यास भाग पाडत.

बाबांचे क्रांतिकार्य योजनापूर्वक असायचे, तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ते त्यांच्याशी बोलणे करत असत. त्यांच्याशी संबंध वाढवत. त्यांच्यावर संस्कार करून सशस्र क्रांतिला आवश्यक अशी मने तयार करून संघटनेत बाबा त्यांना गोवून घेत असत. रजपूतांचा इतिहास, त्यांच्या स्फूर्तीदायक गोष्टी सांगून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करत. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्ती राष्ट्रप्रेमाने व देशभक्तीने भारावून जात. दादरची श्री समर्थ व्यायामशाळा, गिरगावातील माधवाश्रम, गिरगाव चौपाटीवरील कैवल्यधाम योगकेंद्र, सोमण इमारतीतील डॉ. ना. दा. सावरकरांचे औषधालय ही केंद्रे त्यांच्या संपर्क साधण्याच्या मुख्य जागा होत्या. बाबांनी धर्म हवा कशाला, गरुडझेप आदी पुस्तके लिहिली. येशू ख्रिस्त हा हिंदू होता, हा विचार त्यांनी ख्रिस्ताचे हिंदुत्व या पुस्तकातून साधार मांडला आहे. त्यांनी लिहलेले हिंदू राष्ट्र – पूर्वी, आता आणि पुढे, हे पुस्तक तर अनेकांचे डोळे उघडेल. पण इंग्रज व मुसलमानांनी त्याचा इतका धसका घेतला की, त्या पुस्तकावर त्यांनी बंदी घातली होती. हे पुस्तक आता छापून त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याची नितांत गरज आहे.

दुर्बल आर्थिक शक्ती, प्रतिकूल आरोग्य स्थिती, हिंदू समाजाची उदासीनता, निःशस्रता आणि त्यांना उद्धवस्त करावयास टपलेले मुसलमान अशा बिकट परिस्थितीत केवळ प्रखर आत्मविश्वासावर त्यांनी राष्ट्रनिष्ठ अनुयायी जमवून अनेक कामं पार पाडली. आयुष्यभर, स्वातंत्र्यप्राप्ती आणि हिंदू राष्ट्रनिर्मितीचा ध्यास त्यांनी अविरतपणे घेतला. 16 मार्च 1945 मध्ये ते अनंतात विलीन झाले. 
Click here to buy CD/DVD
"Hum Hi Hamare Wali Hai
listen to this song Online(gaana.com)
Link for iTune
Donations Read
News ↓
एनडीए परिक्षेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची निःशुल्क सुविधा
एनडीए परिक्षेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची निःशुल्क सुविधा
मंजिरी मराठे लिखित सावकरांवरील पुस्तकाचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून प्रकाशन
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीरांना अमित शहा यांचे अभिवादन
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीरांना अमित शहा यांचे अभिवादन
बाबाराव सावरकर यांची जयंती साजरी
*अंदमान सहल -नोव्हेंबर २०१७*
संस्कृत अभ्यासक्रम वर्ग
रोखमुक्त व्यवहारांची आधुनिक खेडी ही काळाची गरज
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानवंदना
सावरकर स्मारकाच्या पुढाकाराने धसईतील स्वयंचलित बँकेचे अण्णा हजारेंकडून उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग विसरता कामा नये ः अण्णा हजारे
सावरकर स्मारकाचे रक्तदान शिबीर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समर्पित `आनंदवारी' ब्लॉगचे अनावरण
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची ग्रंथसंपदा राष्ट्रभक्तीच्या प्रचारार्थ खास 50 टक्के सवलतीत
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या धसईत स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकाराने सुरू होणा-या आदिवासी भागातील पहिल्या स्वयंचलित बँकेचे करणार उद्घाटन
एव्हरेस्टवीर रफीक शेख यांची सावरकर स्मारकाला भेट
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशाच्या सुरक्षेचे विचार हेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ः तरुण विजय
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शौर्य व विज्ञान पुरस्काराची दैदिप्यमान परंपरा
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला अव्वल सुरक्षा यंत्रणेबद्दल विशेष पुरस्कार
आत्मविश्वास देखील स्व-संरक्षणाचे प्रभावी माध्यम - पो.नि.गुलाब पाटील
भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा
रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने धसई गाव ठरले देशातील पहिले कॅशलेस गाव
Rebuttal of Defamatory Article on Savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख उत्तर
Videos